इंस्टाग्राम वापरताय? पण जरा सांभाळून! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

instagram
इंस्टाग्राम वापरताय? पण जरा सांभाळून!

इंस्टाग्राम वापरताय? पण जरा सांभाळून!

आकुर्डी - ‘नेहमीप्रमाणे मी इन्स्टाग्रामवर चॅटिंग करत होते. चॅटिंग करता करता अचानक माझी जवळची मैत्रीण माझ्याशी बोलू लागली. १५ मिनिटे बोलून झाल्यावर ती मला म्हणाली, ‘मला तुझी मदत हवी आहे. मी तुझ्या टेक्स्ट मेसेज वर एक नंबर पाठवला आहे. तो मला लगेच पाठव. जवळची मैत्रीण बोलत असल्याने मीदेखील लगेचच पाठवला. थोड्या वेळात तिचे बोलणे बंद झाले आणि माझे अकाउंट हॅक झाल्याचं लक्षात आलं...’ पण हे माझ्या मैत्रिणीने न करता एका हॅकरने मैत्रिणीचा फोटो वापरून हॅक केल्याचे समजले’. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असे प्रसंग घडत आहेत त्याचे हे उदाहरण.

सोशल मीडियावरील ‘सर्वाधिक मार्केटिंग’ होणारे ॲप म्हणजे इन्स्टाग्राम. सर्वसाधारणपणे ९० टक्के युवा पिढी सध्या या ॲपचा वापर करते. कित्येक नवीन नवीन गोष्टी आता त्या ॲपमधे येऊ लागल्या आहेत. रील बनविणे आणि फोटो पोस्ट करून आपले फॉलोअर्स वाढवणे व मार्केटिंग करणे. हे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु सोशल मीडियावर मार्केटिंग करताना दुसरीकडे हॅकिंग प्रमाण देखील वाढले आहे. अशा हॅक अकाउंटच्या माध्यमातून कोणालाही अश्लील संदेश पाठवणे व फोटो एडिट करून गैरफायदा घेणे हे देखील केले जाते.

असे केले जाते हॅक

१. सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही मुलीच्या अकाउंट वरून संदेश पाठवला जातो.

२. १५ ते २० मिनिटे सतत तुमच्याबरोबर संदेशच्या माध्यमातून बोलले जाते. तुमच्याकडे मदत मागितली जाते.

३. बोलत असताना तुमच्या मोबाईलच्या टेक्स्ट बॉक्सवर ६ ते ७ अंकी क्रमांक पाठविला जातो.

४. तो क्रमांक तुमच्याकडून नकळतपणे बोलता बोलता हातचलाखीने काढून घेतला जातो.

५. आपल्या मोबाईल वर आलेला नंबर एकदा त्या समोरच्या व्यक्तीकडे गेला तर अकाउंट हॅक होते.

एकदा हॅक झाले तर ई मेल आयडी बदलून किंवा मोबाईल क्रमांक बदलून काहीही फायदा होत नाही. समोरचा हॅकर व्यक्ती अवघ्या काही सेकंदात सगळं काही बदलून नवीन ई मेल आयडी आणि पासवर्ड सेट करतो. दुसऱ्यांचे अकाउंट वापरून इतरांचे देखील हॅक केले जाते. त्यामुळे सगळे फोटो किंवा व्हिडीओ गोपनीय न राहता त्या हॅकरकडे जातात.

हॅक होऊ नये म्हणून ही घ्या काळजी

१. कोणत्याही व्यक्तीने क्रमांक तुमच्या मोबाईल वर पाठवला असेल तरी तो कोणालाही देऊ नये.

२. अकाउंट वापरण्यात तुम्ही नवीन असाल तर ते अकाउंट गोपनीय ठेवावे

३. कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईल मध्ये जर आपण अकाउंट उघडले असेल तर ते बंद करताना लॉग आऊट करणे आणि नॉट रीमेंबर या पर्यायावर क्लिक करणे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या ३० दिवसांमध्ये बनावट इन्स्टाग्राम उघडून अकाउंट हॅक होण्याच्या तक्रारी तीन आल्या आहेत. परंतु अशा पद्धतीने क्रमांक पाठवून हॅक करण्याचे प्रकार. सध्या जास्त घडू लागले आहेत. तसेच उच्चभ्रू युवापिढीतील कित्येकांसोबत घडू लागले आहेत. याबाबत युवा पिढीने काळजी घेणे गरजेचे आहे.

- संजय तुंगार (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे)

अकाउंट हॅक झाल्यास हे करा

१) इन्स्टाग्रामवर रिपोर्ट हा एक पर्याय असतो त्यावर क्लिक करणे

२) पोलिसांकडे तक्रार दाखल करणे

३) cybercrime.gov.in यावर आपली तक्रार दाखल करणे

Web Title: Todays Latest Marathi News Akr22b00292 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top