वाल्हेकरवाडी शाळेत विद्यार्थी मंत्रीमंडळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हेकरवाडी शाळेत विद्यार्थी मंत्रीमंडळ
वाल्हेकरवाडी शाळेत विद्यार्थी मंत्रीमंडळ

वाल्हेकरवाडी शाळेत विद्यार्थी मंत्रीमंडळ

sakal_logo
By

आकुर्डी, ता.२८ : प्रत्यक्ष निवडणूक कशी असते याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून वाल्हेकरवाडी येथील शाळेत विद्यार्थी मंत्रिमंडळ बनवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया घेतली. निवडणूक अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रक्रिया शाळेत पूर्ण घेण्यात आल्या. त्यामध्ये उमेदवारी जाहीर करणे, अर्ज भरणे, तो माघारी घेणे, चिन्ह प्रदान, प्रचार करणे, आचारसंहिता, प्रचार समाप्त, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, निकाल जाहीर करणे, मंत्रिमंडळ स्थापन करणे या सर्व बाबी घेण्यात आल्या.

मुख्याध्यापिका उज्वला ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजया भुतकर, तर क्षेत्रीय अधिकारी म्हणून राधिका भोईटे यांनी काम पाहिले. ज्योती तापकीर, सुनीता तिकोने यांनी विद्यार्थ्यांबरोबर विविध मदत केली. उपक्रमाची प्रसिद्धी सूर्यभान तिकोने यांनी पाहिली. विद्यार्थी साहिल मुजावर याने केंद्राध्यक्ष, तर विद्यार्थी प्रदीप बनसोडे, शंभू महापुरे , आदित्य जयस्वाल, नवाज मुजावर यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले. माजी विद्यार्थी गणेश बोरा, किशोर तांदळे, अजिंक्य भेगडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन वाल्हेकर, सुनील कवडे, सुनीता भालके, रूपाली वाल्हेकर यांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेतला.

पर्यवेक्षक राजेंद्र कांगुडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. अंजना ब्राह्मणकर, प्रमिला होले, पुष्पा क्षीरसागर, प्रमोदिनी ब्राह्मणकर, शीला खामकर, पोफळे सुजाता, भारती विभांडिक, अश्विनी घुगे, नंदिनी खाडे, गौरी कोल्हापुरे, अनिता महाजन यांनी उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Akr22b00294 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..