संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 
सोहळाप्रमुखपदी ॲड. विकास ढगे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुखपदी ॲड. विकास ढगे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी
सोहळाप्रमुखपदी विकास ढगे

आळंदी, ता. १७ : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विद्यमान तीन विश्वस्तांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, पालखी सोहळा प्रमुखपदी अॅड. विकास ढगे यांची एकमताने निवड झाल्याचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.
देसाई म्हणाले, ‘‘आळंदीतून ११ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. विद्यमान विश्वस्तांचा कार्यकाळ १६ मे रोजी संपला आहे. मात्र, यंदाच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी सध्याच्या तिन्ही विश्वस्तांना १७ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.’’
संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड. विकास ढगे, लक्ष्मीकांत देशमुख यांची विश्वस्तपदाची मुदत संपली होती. दरम्यानच्या काळात नव्या विश्वस्त मंडळाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होती. यंदा वारीच्या नियोजनासाठी सध्याच्या तिन्ही विश्वस्तांना १७ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढ मिळाल्यानंतर विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत ॲड. विकास ढगे यांची पालखी सोहळा प्रमुखपदी एकमताने निवड झाली. ढगे हे पुणे जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष होते. तर पालखी सोहळा प्रमुखपदाची यापूर्वी तीन वेळा जबाबदारी पार पाडली आहे.
निवडीनंतर ॲड. ढगे म्हणाले, ‘‘आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी या वारीच्या काळात लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येईल. त्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com