कासारसाई धरणात मुलाचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासारसाई धरणात
मुलाचा बुडून मृत्यू
कासारसाई धरणात मुलाचा बुडून मृत्यू

कासारसाई धरणात मुलाचा बुडून मृत्यू

sakal_logo
By

बेबडओहळ, ता. २२ ः मावळ तालुक्यातील कासारसाई धरणावर कुटुंबांसह फिरण्यासाठी आलेल्या १४ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना  रविवारी (ता. २२) सकाळी घडली.
प्रद्युम्न गायकवाड ( वय- १४ , रा . कस्पटे वस्ती, वाकड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युम्न व त्याचे आई, वडील, भाऊ, बहीण असे ७ जण रविवारी (ता. २२) सकाळी अकराला कासारसाई धरणावर फिरण्यासाठी आले होते. प्रद्युम्न व त्यांच्या घरचे  पाण्यात उतरले असताना प्रद्युम्नचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडून बुडाला. स्थानिक नागरिक राजाराम केदारी यांच्यासह शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे गणेश ढोरे, प्रवीण देशमुख, अजय शेलार, भास्कर माळी, हर्षल चौधरी आदींसह ग्रामस्थांनी पाच तास अथक प्रयत्न करून रविवारी दुपारी तीनच्या सुमारास प्रद्युम्न याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. कुसगावचे पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड यांनी घटनेची माहिती शिरगाव - परंदवडी पोलिस ठाण्याला दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Bbd22b01130 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..