
बऊर येथे भात लागवड प्रशिक्षण कार्यक्रम
बेबडओहोळ, ता. २ : मावळ तालुका कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्यावतीने खरीप हंगाम पूर्वतयारी चारसूत्री भात लागवड प्रशिक्षण कार्यक्रम बऊर येथे घेण्यात आला.
या प्रसंगी प्रादेशिक भात संशोधन वडगाव येथील केंद्रातील शास्त्रज्ञ संदीप कदम यांनी भात बियाणे व वाण, भात बीजप्रक्रिया, सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील महत्त्व, रोपवाटिकेचे नियोजन व नियंत्रित चारसूत्री लागवड याबद्दल मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. तर कृषी सहायक अश्विनी खंडागळे यांनी जैविक बीजप्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. या वेळी बऊरचे सरपंच प्रवीण भवार, उपसरपंच नंदाबाई दाभाडे, शंकर शिंदे, संदीप खिरीड, अनिता वायभट, कृषी सहायक प्रमिला भोसले, दत्तात्रेय गावडे, शीतल गिरी, अर्चना वडेकर आदी उपस्थित होते.
भात लागवडीअगोदर रोग कीड नियंत्रणासाठी रासायनिक (थायरम) व जैविक (अझॅटोबॅक्टर व
पीएसबी) यांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी, त्यामुळे रोग कीडमुक्त फुटव्यांची संख्या वाढून उत्पन्नात भर पडते.
अश्विनी खंडागळे
कृषी सहायक, उर्से
भात पुनर्लागवड करताना रोपाचे वय साधारण २० ते २२ दिवसांचे असावे, त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते. तसेच जास्त वयाची रोपे पुनर्लागवडीसाठी वापरल्यास उत्पादनात घट होते.
संदीप कदम
वरिष्ठ संशोधन सहायक, वडगाव
Web Title: Todays Latest Marathi News Bbd22b01136 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..