दहा गावांची गैरसोय थांबणार ग्रामस्थांकडून नवीन मार्गाचे उद्‍घाटन; परंदवडी-ऊर्से पीएमपीएल बससेवा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा गावांची गैरसोय थांबणार

ग्रामस्थांकडून नवीन मार्गाचे उद्‍घाटन; परंदवडी-ऊर्से पीएमपीएल बससेवा सुरू
दहा गावांची गैरसोय थांबणार ग्रामस्थांकडून नवीन मार्गाचे उद्‍घाटन; परंदवडी-ऊर्से पीएमपीएल बससेवा सुरू

दहा गावांची गैरसोय थांबणार ग्रामस्थांकडून नवीन मार्गाचे उद्‍घाटन; परंदवडी-ऊर्से पीएमपीएल बससेवा सुरू

sakal_logo
By

बेबडओहळ, ता. ४ : निगडी ते सोमाटणे मार्गे परंदवडी-ऊर्से पीएमपीएल बससेवा सुरू केली आहे. या नवीन मार्गावरून बसचे आगमन झाल्याने ग्रामस्थांनी उद्‍घाटन केले. या नवीन बस सेवेमुळे दहा गावांची होणार गैरसोय थांबणार आहे.

ऊर्से ते बेबडओहळ औद्योगिक परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तो वर्ग दररोज ये-जा करत असतो. शेतकरी, दुग्धव्यवसायिक दररोज पिंपरी-चिंचवड या भागात ये-जा करतात. तर विद्यार्थीही या भागात शिक्षणासाठी जातात. त्यांची सर्वांची मोठी गैरसोय होते. या नवीन बससेवेचा लाभ सोमाटणे, ऊर्से, बेबडओहळ, धामणे, परंदवडी व जवळील दहा गावातील नागरिकांना होणार आहे.

माजी सरपंच दत्तात्रेय पापळ यांच्या पुढाकरातून सुरू झालेल्या सार्वजनिक वाहतूक बसचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी संत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, भारत ठाकूर, माजी सरपंच बायडाबाई पापळ, विठ्ठल सुतार, कुंदन भोते, शिवाजी भोते, भरत भोते, संतोष कदम, दिलीप जगदाळे, युवराज सुतार, तानाजी भोते, शांताराम भोते, बुवासाहेब भोते, अप्पा कुंजीर, रवी पगारे, रामदास थोरात, गणेश दोरगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया
बेबडओहळ, ऊर्से येथील भागात वाढलेले नागरिकरण पाहता, बससेवा सुरू होणे गरजेचे होते. आता याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. बससेवा सुरू होण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, वाहतूक संघटक संदीप झांबरे, पीएमपीएलचे व्यवस्थापक शांताराम वाघिरे आदींचे सहकार्य लाभले.
-शांताराम भोते, विधानसभा सल्लागार, शिवसेना

Web Title: Todays Latest Marathi News Bbd22b01152 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..