
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची मागणी
ऊर्से, ता. २० ः पंतप्रधान किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना दुरुस्ती करता यावी व अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून लाभ मिळण्यासाठी उचित कार्यवाही करण्याची मागणी
भाजपने तहसीलदारांकडे केली आहे.
भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी तहसीलदार मधूसुदन बर्गे, नायब तहसीलदार व कृषी अधिकारी यांची भेटी घेऊन मावळ तालुक्यातील अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे, पाणंद रस्त्यांचे, शेत बांधांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी उचित कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना दुरुस्ती करताना भरपूर अडचणीचा सामना करावा लागत असून, शासन दरबारी चकरा मारूनसुद्धा त्यांचा दुरुस्तीचा प्रश्न सुटत नसल्याने तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. यासंदर्भात देखील तहसीलदारांनी लक्ष घालावे व प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी दुरुस्तीची आवश्यकता असणाऱ्या शेतकऱ्यांना दुरुस्ती करताना अडचणी येऊ नये, यासाठी तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली.
यावेळी सरचिटणीस सुनील चव्हाण, किरण राक्षे, शत्रुघ्न धनवे, अनंता येवले आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Bbd22b01163 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..