पवनमावळात खरीप पिके उत्पादन वाढ मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवनमावळात खरीप पिके  
उत्पादन वाढ मोहीम
पवनमावळात खरीप पिके उत्पादन वाढ मोहीम

पवनमावळात खरीप पिके उत्पादन वाढ मोहीम

sakal_logo
By

ऊर्से, ता. ३० : महाराष्ट्र शासन कृषी विभागाची १७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत पवनमावळमध्ये खरीप पिके उत्पादन वाढ मोहीम राबविली गेली. या मोहिमेअंतर्गत पवनमावळात भात पीक उत्पादन वाढ कार्यक्रम, मंडळ कृषी अधिकारी काळे कॉलनी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

मोहिमेत भात उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना सांगण्यात आल्या. यामध्ये भात पिकामध्ये युरिया ब्रिकेट खताचा वापर, भात कीड व रोग नियंत्रण, कामगंध सापळे लावणे व सापळ्यामधील ल्युअर गोळी बदलणे महत्त्व, भात पिकातील तण नियंत्रण, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भात पिकामधील शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या याबाबत मार्गदर्शन कृषिसहाय्यक विकास गोसावी यांनी केले. सध्या शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय पंतप्रधान किसान सन्मान योजना चे E- KYC करणेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
खरीप हंगाम भात पिकाच्या दृष्टीने चारसूत्री लागवड ७० हेक्टर, एस.आर.टी. लागवड १५ हेक्टर, क्षेत्रावर करण्यात आली आहे. खरीप हंगामामध्ये जून महिन्यात शेतकऱ्यांनी बियाणे बिजप्रक्रिया करून गादी वाफ्यावर रोपवाटिका टाकल्यामुळे भातरोपे निरोगी व जोमदार तयार झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पद्धतीला फाटा देत उत्पादन वाढीसाठी चारसूत्री, एस.आर.टी. पद्धतीने मोठ्या प्रमाणात भातलागवडी केल्या आहेत. त्या अनुषंगाने देखील शेतकऱ्यांना कामगंध सापळ्याचा किडीचे नर पतंग पकडण्यासाठीच्या पद्धती, कीड रोग उपाययोजना याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. क्रॉपसॅप अंतर्गत कीड व रोग निरिक्षणे घेण्यासाठी भातपीक प्लॉटला फेरोमेन ट्रॅप (कामगंध सापळे ) लावण्यात आले आहेत. त्याची निरीक्षणे घेण्याचे काम चालू आहे.

सदर कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक नागनाथ शिंदे, प्रगतशील शेतकरी प्रकाश जगताप, शंकर धनवे, विलास शिंदे, अंकुश ओव्हाळ, संभाजी कडू, लहू धनवे, गणेश शिंदे, मल्हारी आखाडे, किसन आखाडे, सदाशिव धनवे, काळू ओव्हाळ, शशिकांत ओव्हाळ, रघुनाथ ओव्हाळ, बाळू आखाडे, शंकर शिंदे, कैलास केदारी, अंकुश सुतार, शाम शिंदे, वाघू दरेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Bbd22b01184 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..