भातपीक स्पर्धेमध्ये मावळमधील शेतकऱ्यांचे विक्रमी उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भातपीक स्पर्धेमध्ये मावळमधील 
शेतकऱ्यांचे विक्रमी उत्पन्न
भातपीक स्पर्धेमध्ये मावळमधील शेतकऱ्यांचे विक्रमी उत्पन्न

भातपीक स्पर्धेमध्ये मावळमधील शेतकऱ्यांचे विक्रमी उत्पन्न

sakal_logo
By

ऊर्से, ता. १३ : राज्य शासनाच्यावतीने सन २०२१-२२ या सालामध्ये घेण्यात आलेल्या भातपीक स्पर्धेमध्ये मावळमधील दोन शेतकऱ्यांनी विक्रमी अनुक्रमे १२९.६१ व १२७.४१ क्विंटल हेक्टरी भात उत्पन्न घेऊन पुणे विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या यशाचे संपूर्ण मावळ तालुक्यातून कौतुक होत आहे. नितीन चंद्रकांत गायकवाड व तुकाराम नथुराम लष्करी ही शेतकऱ्यांची नावे आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध शेतकऱ्यांकडून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञान अवलंब केला जाईल. तसेच विजेत्यामार्फत परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
गायकवाड व लष्करी यांनी भातपीक उत्पादन वाढीसाठी चारसूत्री पद्धतीने भातलागवड यामध्ये भातपीक बीजप्रक्रिया, गादीवाफ्यावर रोपवाटिका, हिरवळीच्या खताचा वापर व चारसूत्री पद्धतीने नियंत्रित भातलागवड करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून हे यश संपादन केले आहे.
नितीन गायकवाड यांना मंडळ कृषी अधिकारी दत्ता शेटे, कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे, कृषी सहायक मनीषा घोडके व तुकाराम लष्करी यांना कृषी सहायक घनश्याम दरेकर, कृषी पर्यवेक्षक नवीन बोराडे तसेच तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, पंचायत समिती कृषी अधिकारी संताजी जाधव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Bbd22b01185 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..