आत्मा योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्मा योजनेंतर्गत 
महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा
आत्मा योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा

आत्मा योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा

sakal_logo
By

ऊर्से, ता. १६ : मौजे चांदखेड येथे तालुका कृषी अधिकारी मावळ व मंडळ कृषी अधिकारी काळेकॉलनी यांच्यावतीने सन २०२२-२३ या वर्षात आत्मा योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सध्या भात पीक महत्त्वाच्या टप्प्यात असल्याने त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या शेती शाळेत महिला शेतीशाळेचा चौथा वर्ग कृषी सहायक मनीषा घोडके व स्मिता कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदर वर्गामध्ये शेतीशाळा प्रतिज्ञा घेऊन सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मागील वर्गाचा आढावा घेण्यात आला. सद्यःस्थितीत भात पीक फुटव्याच्या अवस्थेत आहे. तर काही ठिकाणी भाताच्या लोब्या दिसू लागल्या आहेत. भातपिकासाठी आताचा कालावधी हा महत्त्वपूर्ण आहे. कारण सध्या भात पिकांवर कीड व रोग येण्यास वातावरण पोषक झाले आहे. आता पडणाऱ्या पावसाने सध्या कीड व रोगाचे प्रमाण कमी आहे. त्याअनुषंगाने चांदखेड येथे आज घेण्यात आलेल्या शेतीशाळा वर्गात दशपर्णी अर्क, निबोळी अर्क कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. कीड व रोगासाठी त्याचे महत्त्व व फवारणी, कामगंध सापळे, पक्षीथांबे, याबाबत यावेळी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भात पिकावर येणारे कीड व रोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सद्यस्थितीला भातावर तुडतुडे, खोडकीडा, पाने गुंडळणारी आळी, करपा, कडा करपा हे रोग येऊ शकतात. पावसाची उघडीप, हवेतील आर्द्रता ह्याचे प्रमाण वाढल्यास किडी व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याबाबत महिला शेतकऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना कृषी सहायक मनीषा घोडके व स्मिता कानडे यांनी सांगितल्या. शेतीशाळामध्ये महिला शेतकऱ्यांना परसबाग, भाजीपाला बियाणे मिनिकिट तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
   
शेतीशाळेच्या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, मंडळ कृषी अधिकारी दत्ता शेटे, कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे, स्मिता कानडे, राहुल घोगरे, बीटीएम आत्मा तसेच भातपीक शेतीशाळेतील २५  महिला विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कोट
महिला शेतकऱ्यांनी भातपिकाबाबत सखोल ज्ञान अवगत केले असल्याने भात पिकाच्या कीड व रोग ओळखायला लागल्या आहेत. नक्कीच पुढील काळात अनेक महिला शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
- दत्तात्रय पडवळ, तालुका कृषी अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Bbd22b01188 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..