डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रेणुका वाडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या 
अध्यक्षपदी रेणुका वाडेकर
डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रेणुका वाडेकर

डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रेणुका वाडेकर

sakal_logo
By

ऊर्से, ता. २२ : पवन मावळातील डोणे येथील एकता प्रतिष्ठान आयोजित डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रेणुका वाडेकर यांची निवड करण्यात आली. एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून डोणे व परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र, या वर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवीत ‘सन्मान स्त्रीचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

समितीच्या उपाध्यक्ष राणी खिलारी, कार्याध्यक्ष सुषमा आरूठे, खजिनदार उषा घारे, सचिव वैशाली चांदेकर व सदस्य सोनाली काळभोर, आकांक्षा कारके, शीतल घारे, सुप्रिया कारके या सर्वांची निवड एकता प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब घारे, योगेश कारके, रवींद्र काळभोर, विशाल कारके, मल्हारी खिलारी, विश्वास चांदेकर, पोलिस पाटील उमेश घारे व सदस्य सोमनाथ खिलारी या सर्वांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव समितीची निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Bbd22b01190 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..