क्रॉपसॅप संलग्न शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा उपक्रमाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रॉपसॅप संलग्न शेतकऱ्यांसाठी 
शेतीशाळा उपक्रमाचे आयोजन
क्रॉपसॅप संलग्न शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा उपक्रमाचे आयोजन

क्रॉपसॅप संलग्न शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा उपक्रमाचे आयोजन

sakal_logo
By

ऊर्से, ता. १६ : बेबडओहोळ येथे तालुका कृषी अधिकारी मावळ व मंडळ कृषी अधिकारी यांच्या वतीने क्रॉपसॅप संलग्न शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या भाताचे पीक महत्त्वाच्या अंतिम टप्प्यात असल्याने करपा, कडा करपा व तपकिरी तुडतुडे दिसू लागल्याने यावर उपाय म्हणून चौथ्या शेतीशाळा वर्गात कीड व रोग यांची ओळख व त्यावर नियंत्रणाचे उपाय औषध फवारणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
         
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजने अंतर्गत भात पीक यांत्रिकीकरण मंडळ कृषी अधिकारी काळे कॉलनी मार्फत दहा हेक्टर क्षेत्रावर राबवला जात आहे. मावळ कृषी विभागाच्या वतीने पवन मावळ परिसरात भात संशोधन केंद्र वडगाव मावळ येथील शास्त्रज्ञ डॉ. संदीप कदम यांनी भात पिकावरील कीड व रोगांची पाहणी केली व नियंत्रणासाठी उपाय व योजनांचे सखोल मार्गदर्शन केले.

बेबडओहोळ येथील शेतकरी राजेंद्र घारे यांच्या शेतात जाऊन कीड रोगांची पाहणी केली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रेय शेटे, कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे, कृषी सहायक अश्विनी खंडागळे उपस्थित होते. शेतीशाळा वर्गाचे आयोजन कृषी मित्र संदीप घारे व सहायक कृषी अधिकारी प्रमिला भोसले यांनी केले होते.

कोट:
सद्यःस्थितीत भातपीक महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याने जेथे पाण्याचा योग्य निचरा होत नाही तेथे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी शेतीशाळेचे आयोजन शेतकऱ्यांसाठी करण्यात आले होते.
- डॉ. संदीप कदम, वरिष्ठ संशोधन सहायक, मावळ

कोट :
पिकावर फवारणी दुपारी चार नंतर पाऊस नसताना करावी. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत फवारणी करू नये.
- प्रमिला भोसले, सहायक कृषी अधिकारी, बेबडओहोळ