उर्सेत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उर्सेत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
उर्सेत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

उर्सेत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

उर्से, ता. २४ : पुणे जिल्हा परिषद पुणे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत पंचायत समिती मावळ आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्से येथे मोठ्या उत्साहात झाल्या.

या कार्यक्रमास मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, सरपंच भारती गावडे, सदस्य सतीश कारके, अश्विनी बराटे, जयश्री सावंत, ग्रामसेवक बाळासाहेब गावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, सुधीर बराटे, बाळासाहेब कारके, शिवाजी धामणकर, भास्कर ठाकूर, मधुकर शिंदे, प्रमोद गायकवाड, वैशाली धामणकर, सविता तिकोने, खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

खेळाडूंच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिल्यानंतर मैदानाचे पूजन करून सामन्यांना सुरुवात झाली. कबड्डी, खो-खो, धावणे ,लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळीफेक अशा विविध स्पर्धामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खेळ कौशल्य दाखवत स्पर्धांचा आनंद घेतला. उपस्थित सर्व खेळाडू, सर्व शिक्षक, मान्यवर यांच्यासाठी भोजन आणि पाणी व्यवस्था ग्रामपंचायत उर्सेतर्फे करण्यात आली. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत उर्से, शाळा व्यवस्थापन समिती उर्से, पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग, उर्से शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला काळे आणि शिक्षकवृंद यांनी केले.
स्पर्धा प्रकारातील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय)

वैयक्तिक खेळ
- पन्नास मीटर धावणे (लहान गट-मुले)- श्रेयस भांडे, शाळा करंजगाव, भूषण जाधव, कशाळ, जय केदारी, ताजे.
- पन्नास मीटर धावणे (लहान गट मुली) ः लावण्या गायकवाड, कोयते वस्ती, नियती दहिभाते, करुंज, अशोक यादव, कान्हे.
- शंभर मीटर धावणे (मोठा गट मुले) ः विशाल जाधव, भोईरे, गणेश शिर्के, करंजगाव, प्रणव गायकवाड.
- शंभर मीटर धावणे (मोठा गट मुली) ः अवंतिका हनुमंत येवले, शिलाटणे, आदिती वाडेकर, नानोली, स्नेहल जोरी, इंगळूण.
- उंच उडी स्पर्धा (लहान गट) ः सम्राट भालेसेन, चांदखेड, विराज रोडगे, माळवाडी, आराध्य वाडेकर, वहानगाव.
- उंच उडी मुली ः वृंदावनी ठाकर, माळेगाव, रुद्रा थरकुडे, कशाळ, आदित्य कानडे, गहुंजे.
- उंच उडी मोठा गट (मुले) ः विशाल जाधव, भोईरे, स्वराज्य तिकोने, वहानगाव, साहिल ठाकर, ओझर्डे.
- उंच उडी (मोठा गट मुली) ः समृद्धी वाघवले, दारुंब्रे, भाग्यश्री करवंदे, कल्हाट, ..........
- लांब उडी (लहान गट मुले) ः सोहम ठोंबरे, ब्राह्मणवाडी-बऊर, सुरजकुमार रैकवार, कान्हे, भूषण जाधव, कशाळ.
- लांब उडी (लहान गट मुली) ः वंदना गौतम, उर्से, वैष्णवी दाभणे, कांब्रे नामा, रुद्रा थरकुडे, कशाळ.
- लांब उडी (मोठा गट मुले) ः सचिन कामत, कुणे नामा, शंभूराजे सोरटे, दारुंब्रे, विशाल जाधव, भोयरे.
- लांब उडी (मोठा गट मुली) ः समीक्षा करवंदे, कल्हाट, भूमिका घारे, येलघोल, प्रांजल हेमाडे,वडेश्वर.
- गोळा फेक (मोठा गट मुले) ः विशाल जाधव, भोयरे, सूजल शिंदे, उकसाण, स्वराज पिंपळे, पिंपळोली.
- गोळा फेक (मोठा गट मुली) ः मानसी तिकोने, उर्से, प्रांजल हेमाडे, वडेश्वर, साक्षी शिंदे, मळवंडी ठुले.
- थाळीफेक (मुले) ः विशाल जाधव, भोयरे, स्वराज पिंपळे, पिंपळोली, राज ढम, आढले खुर्द.
- थाळी फेक (मुली) ः हर्षदा वीरकर, साई, वैष्णवी भोईर, आढले खुर्द, आदिती वाडेकर, नानोली.

सांघिक स्पर्धा
- कबड्डी (मुले) ः भोईरे बीट, तळेगाव, येलघोल बीट, काले
कॉलनी, शाळा गोवित्री बीट, खडकाळा अ.
- कबड्डी (मुली) ः कल्हाट-बीट, तळेगाव, दारुंब्रे बीट, वडगाव, नाणे बीट, खडकाळा अ.
- खो खो (मुले मोठा गट) ः येलघोल बीट, काले कॉलनी, गोडुंब्रे बीट, वडगाव, इंगळूण बीट, तळेगाव.
- खोखो (मोठा गट मुली) ः येलघोल बीट, काले कॉलनी, उकसान बीट-खडकाळा अ, गोडुंब्रे बीट, वडगाव.
- खो खो (लहान गट मुले) ः आढे बीट, काले कॉलनी, गोडुंब्रे बीट, वडगाव, कार्ला बीट लोणावळा.
- खो खो (लहान गट मुली) ः नानोली-बीट, तळेगाव, गोडुंब्रे बीट, वडगाव, आढे बीट, कालेकॉलनी.

फोटो नंबर : 2175