डोणेत कोरडवाहू शेती अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोणेत कोरडवाहू शेती अभियान
डोणेत कोरडवाहू शेती अभियान

डोणेत कोरडवाहू शेती अभियान

sakal_logo
By

ऊर्से, ता. १५ : डोणे येथे कृषी विभागामार्फत नुकतेच कोरडवाहू शेती अभियान सन २०२२-२३ अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सहायक कृषी अधिकारी अक्षय ढूमणे यांनी केली. पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय, मुरघास विषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन पशुसंवर्धन अधिकारी अंकुश देशपांडे व अजय सुपे यांनी केले.

सदर कोरडवाहू शेती अभियान सन २०२२-२३ अंतर्गत गाई, म्हशी खरेदीसाठी शेतकरी निवड लॉटरी काढण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, मंडळ कृषी अधिकारी दत्ता शेटे, कृषी पर्यवेक्षक स्मिता कानडे, सरपंच सारिका कुंभार, उपसरपंच पोपट वाडेकर व मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.