Sun, March 26, 2023

मावळात महादेव मंदिरात अभिषेक, महापूजा
मावळात महादेव मंदिरात अभिषेक, महापूजा
Published on : 18 February 2023, 1:32 am
ऊर्से, ता. १८ : पवन मावळात महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. ऊर्से, धामणे, बेबडओहोळ, परंदवडी, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, शिवणे गावात असलेल्या काही जुन्या व नवीन महादेव मंदिरात सकाळ पासूनच महिलांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच महादेव मंदिरात अभिषेक, महापूजा, प्रसादाचे वाटप आदी कार्यक्रम सुरू होते. गावात काही प्राचीन मंदिरात प्रामुख्याने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ऊर्से येथील डोंगरावरील असलेल्या छोट्या गुफेत महादेवाची पिंड आहे. या ठिकाणी गेली बारा वर्षांपासुन डोंगरवाडी व ऊर्से ग्रामस्थ चांगलीच गर्दी करू लागले आहेत. धामणे गावातील निळकंठेश्वर मंदिरात देखिल भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.