
ऊर्से टोलनाका नाव देण्याची मागणी
ऊर्से, ता. १ : ऊर्से ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यास ऊर्से टोल नाका नाव देण्यात यावे याबाबत भाजप किसान मोर्चा मावळ तालुका यांनी मागणी केली आहे. गेली वीस वर्षांपासून ऊर्से ग्रामस्थांची मागणी आहे. मागणी संदर्भात वेळोवेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाशी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. तरी देखिल संबंधित विभाग प्रशासनाने याची दखल घेतली नाही. याबाबत मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून सदर पत्राची प्रत मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे, अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आली आहे. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष सुभाष धामणकर यांनी सांगितले. निवेदनावर अध्यक्ष सुभाष धामणकर, सरपंच भारती गावडे, सदस्य सतीश कारके, जालिंदर धामणकर, बाळासाहेब धामणकर, सुधीर बराटे, गुलाब घारे, सुलताण मुलाणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.