Mon, June 5, 2023

उर्सेत महिलांना मार्गदर्शन
उर्सेत महिलांना मार्गदर्शन
Published on : 9 March 2023, 9:18 am
ऊर्से : ध्यास केअर्स फाउंडेशन मावळ व एकता महिला मंच डोणे आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिर व महिलांचे आजार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन डोणे येथे करण्यात आला होते. या वेळी महिला व विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. डॉ. विद्या पोतले यांनी फास्ट फूड शरीरास हानिकारक असून घरचा सकस आहार हेच निरोगी आरोग्याचे सूत्र आहे, असे मार्गदर्शन केले. या वेळी प्रा. देविदास आडकर एकता महिला मंचाच्या सर्व पदाधिकारी व महिला-भगिनी, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष अशोक कारके, विलास खिलारी, नामदेवराव घारे, वसंत काळभोर, दत्तोबा कारके, अकुंश कारके, बाळासाहेब घारे आदी ऊपस्थित होते.