Sun, Sept 24, 2023

आढले बुद्रुक सोसायटीच्या
अध्यक्षपदी नामदेवराव घारे
आढले बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी नामदेवराव घारे
Published on : 11 May 2023, 8:21 am
ऊर्से, ता. ११ : पवन मावळातील डोणे येथील वारकरी संप्रदायातील नामदेवराव घारे यांची आढले बुद्रूक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी नाथा सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी कामकाज पाहिले. सचिव तुकाराम लोहर यांनी कागदपत्रांची पुर्तता केली. यावेळी डोणे तंटामुक्ती अध्यक्ष अशोक कारके, मावळ तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संजय कारके, चंद्रकांत चांदेकर, संदीप लांडगे, अनिल महाराज घारे, उपसरपंच पोपट वाडेकर, राहुल घारे, शेखर काळभोर, समीर खिलारी, योगेश कारके, सरपंच लहू सावळे, शरद घोटकुले, शहाजी घोटकुले, गोरख साठे, दशरथ साठे, विश्वनाथ घोटकुले, संजय खिलारी व ग्रामस्थ उपस्थित होते.