‘निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या 
कामाची चौकशी करा’

‘निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करा’

ऊर्से, ता. १५ : मावळ उत्तर विभागातील काले कॉलनी, पवनानगर ते बऊर या हद्दीत चालू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय काजळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
मावळ उत्तर विभागातील काले कॉलनी, पवनानगर, येळसे, कडधे, करूंज ते बऊर या हद्दीत चालू असलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व शासनाने दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. या कामामध्ये अनेक त्रुटी आहेत. कामाच्या अंदाजपत्रकानुसार काम करण्यात आलेले नाही. तरी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काजळे यांनी केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने रुंदीकरण करत असताना मुरूम न वापरता काळी माती वापरण्यात आलेली आहे. जेएसबीची (खडीकरण) जाडी कमी केलेली असून डब्ल्यूबीएम केलेला नाही. बीएमची (डांबरीकरण) जाडी ५० मिमी व कारपेटची लांबी २० मिमी नसून ती कमी आहे. कामाच्या माहितीचा फलक लावलेला नाही. साइड पट्ट्यांचे कठीण मुरूमाने भराव करण्यात आलेला नाही. साइड कठड्यांचे बांधकाम करण्यात आलेले नाही व काही ठिकाणी केले पण ते निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. या रस्त्याचे सात मीटर रुंदीकरण इस्टिमेटप्रमाणे करणे बंधनकारक असताना ते देखील करण्यात आलेले नाही. वरील सर्व मुद्द्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून ठेकेदार, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘‘काम चांगल्या दर्जाचे आहे. पुढे कॉंक्रिटीकरण करणार आहे व त्या कामाची वर्क ऑर्डरही झाली असून ठेकेदारालाही कामासंदर्भात सांगितले आहे.’’
- धनराज दराडे, उपअभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com