पिंपळखुटे-मळवंडी ढोरे मार्गावरील
रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

पिंपळखुटे-मळवंडी ढोरे मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

ऊर्से, ता. १३ : पवन मावळातील बेबडओहळ ते पवनानगर मार्गावरील पिंपळखुटे ते मळवंडी ढोरे या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरणामुळे दोन्ही बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचा त्रास कमी होणार आहे. बेबडओहळ ते पवनानगर हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या भागातील वाड्या-वस्त्यांमधून मुख्य रस्त्यावर जायचे झाल्यास या रस्त्याचा वापर केला जात आहे. सध्या या रस्त्याची रुंदी कमी असल्याकारणाने दोन्ही बाजूंनी मोठी वाहने सहजासहजी ये-जा करता येत नव्हती. त्यामुळे या रस्त्याची रुंदी वाढवावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येथील ग्रामस्थांनी केली होती.
पवन मावळातील वाढते वस्तीकरण व येथील पर्यटन स्थळे यासाठी येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळ्यात येत असतात. पर्यटन स्थळाच्या दृष्टीने पाहता येथील रस्ते मोठे असणे गरजेचे आहे. पण या मार्गावरील अद्याप रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. तर अनेकदा वाहने रस्ता सोडून बाजूला उतरल्याने छोट्या वाहनांचा अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे सध्या काही ठिकाणी सुरू असलेल्या रुंदीकरणातून अपघाताचा प्रश्न सुटणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com