Sat, Sept 30, 2023

महिन्यापूर्वी लग्न झालेल्या
जावयाचा सासरवाडीत खून
Pimpri Crime : महिन्यापूर्वी लग्न झालेल्या जावयाचा सासरवाडीत खून
Published on : 5 June 2023, 10:39 am
पिंपरी - एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या जावयाचा सासरवाडीत अज्ञातांनी खून केला. ही घटना रविवारी (ता. ४) मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. सूरज काळभोर (रा. आकुर्डी) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज काळभोर यांचा एक महिन्यापूर्वी गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी विवाह झाला. दरम्यान, रविवारी दुपारी सूरज पत्नीला घेऊन सासऱ्याचा शेतात फेरफटका मारत होते.
त्यावेळी तीन ते चार जणांची सागर यांना गाठले. आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार लूटमार करण्याचा उद्देशाने केल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.