
महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
भोसरी, ता. ४ : महात्मा बसवेश्वर यांची जयंती भोसरीतील इंद्रायणीनगरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक संजय वाबळे यांच्या हस्ते झाले. बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी नगरसेवक रवी लांडगे, ज्येष्ठ उद्योजक, चंद्रकांत रासकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर विचार प्रसारक व प्रचारक बसवराज कणजे यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानात ते म्हणाले, ‘‘महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील सुधारणावादी संत होते. त्यांनी विविध जाती-धर्मातील बांधवांना एकत्र घेऊन अनुभव मंटपची स्थापना केली. समाजामध्ये मानवतावादी, विज्ञानवादी विचार रुजवविण्याचे कार्य केले. आजच्या काळात महात्मा बसवेश्वर यांचे विचार जोपासल्याने समाजा समाजातील जातीय तेढ दूर होऊन राष्ट्रीय ऐक्य टिकवता येईल.’’ कार्यक्रमाचे आयोजन शिवा प्रतिष्ठाण व श्री संजय वाबळे प्रतिष्ठाण आदींनी केले.
फोटो
फोटो ओळी
इंद्रायणीनगर, भोसरी : विश्वगुरु महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात व्याख्याते बसवराज कणजे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक संजय वाबळे, रवी लांडगे आणि मान्यवर.
Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00624 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..