
‘राजर्षी शाहू महाराज विविध योजनांचे प्रणेते’
भोसरी, ता. ७ ः ‘‘छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक होते. पाळणाघरे, वृद्धाश्रम, चारा छावणी, या विविध योजनांचे राजर्षी शाहू महाराज प्रणेते होते. समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्तींवर शाहूमहाराजांनी प्रेम केले, त्यांना आधार दिला, असा जाणता राजा पुन्हा होणे नाही,’’ असे मत व्याख्याते अॅड. संभाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.
भोसरीतील लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष कृतज्ञता दिनानिमित्त ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व संस्थेचे खजिनदार अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट, माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे, एसीपी अमोल देसाई, उद्योजक संजय राऊत, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, विराज लांडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे डॉ. श्रेया दाणी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपक पावडे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00627 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..