‘दस्त नोंदणीस नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दस्त नोंदणीस नकार देणाऱ्या
अधिकाऱ्यांवर कारवाई करावी’
‘दस्त नोंदणीस नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी’

‘दस्त नोंदणीस नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी’

sakal_logo
By

भोसरी, ता. १२ ः औरंगाबाद हायकोर्ट खंडपीठाचा लेखी आदेशान्वये दुय्यम निबंधक अधिका-यांना दस्त नोंदणीस नकार देण्याचा कोणताही अधिकार नाही, तरीही अधिकारी दस्त नोंदणी करण्यास नकार देण्याचे चित्र पुणे शहर, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सर्रास आढळून येत आहे. त्यामुळे दस्त नोंदणी करण्यास येणाऱ्या नागरिकांना नाहक मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे दस्त नोंदणीस नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे भोसरीतील अॅड. बाळासाहेब थोपटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अॅड. थोपटे यांनी पुढे म्हटले आहे, की नोंदणी अधिका-याला फक्त मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, दस्तांच्या व्यक्तींची ओळख आहे की नाही फक्त याची पडताळणी करणे आदी गोष्टी पाहाव्या लागतात. मात्र हे अधिकारी आपल्या स्वतःच्या आर्थिक लाभासाठी विनाकारण दस्त नोंदणीस नकार देवून नागरिकांना नाहक वेठीस धरत आहेत. याशिवाय एखाद्याने दस्त नोंदणीस का नकार देत आहेत, याबाबत लेखी मागितले असता कोणताही रजिस्ट्रार लेखी देत नाही. तरी अशा विनाकारण दस्त नोंदणीस नकार देणा-या रजिस्ट्रारांवर खातेनिहाय चौकशी करुन फौजदारी कारवाई सरकारने करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
--------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00632 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top