इंद्रायणीनगरात सतत खंडित वीज पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्रायणीनगरात सतत खंडित वीज पुरवठा
इंद्रायणीनगरात सतत खंडित वीज पुरवठा

इंद्रायणीनगरात सतत खंडित वीज पुरवठा

sakal_logo
By

भोसरी, ता. १३ ः येथील इंद्रायणीनगरातील काही भागांमधील नागरिक खंडित वीज पुरवठ्याने हैराण झाले आहेत. त्यातच बुधवारी अचानक दाब वाढल्याने काही नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली. त्यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले.

राजवाडामधील इमारत क्रमांक २२मध्ये राहणाऱ्या इमरान तांबोळी यांच्या घरातील पंखे, इन्वर्टर, वीज बल्ब, सीसीटीव्ही, गिझर, वीज मीटर नादुरुस्त झाले. तर स्कीम क्रमांक ११२० मधील इमारत क्रमांक २७ मधील अशोक मोरे यांच्या घरातील पंखे आणि अॅडॅाप्टरमध्ये बिघाड झाला. तर एकाच्या कार्यालयातील संगणक मॅानिटर नादुरुस्त झाला. याविषयी मोरे म्हणाले, बुधवारी (ता. ११) घरातील पंखा कधी हळू तर कधी एवढा वेगात फिरत होता, की पंखा खाली पडण्याची भीती वाटत होती. महावितरणचे अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी सांगितले, ‘‘घरगुती उपकरणे कमी-जास्त विद्युत दाबाने नादुरुस्त झाल्यास त्याच्या भरपाईची कोणतीही तरतूद महावितरणकडे नाही.’’

...आणि मोटारी उलट्या फिरू लागल्या
गुरुवारी (ता. १२) इंद्रायणीनगरातील विद्युत पुरवठ्यासंबंधित दुरुस्तीचे काम हाती घेतले होते, शुक्रवारी (ता. १३) स्कीम क्रमांक ११२०मधील सुमारे ७० इमारतीसह इतर भागात सकाळी पाणी पुरवठा होतो. मात्र नागरिकांनी पाणी वरच्या टाकीत चढविण्यासाठी पाण्याच्या मोटारी सुरू केल्यावर त्या उलट्या फिरू लागल्याने पाणीच भरता आले नसल्याचे आनंद सिमलन यांनी सांगितले. महावितरणला यासंबंधी कळविल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (ता. १३) दुपारी एकच्या सुमारास दुरुस्ती सुरू केली. या विषयी महावितरणच्या कर्मचाऱ्याने सांगितले, की गुरुवारी विद्युत दुरुस्तीची कामे करत असताना अतिउच्चदाब डीपी स्ट्रक्चरवरील विद्युत वाहिन्या चुकीच्या पद्धतीने जोडण्यात आल्याने पाण्याच्या मोटारी उलट्या फिरत होत्या.

कोट
इंद्रायणीनगरातील विद्युत पुरवठा नेहमीच पाणी सुटण्याच्या वेळेस खंडित होतो. त्यामुळे पाणी भरता येत नाही. त्याचप्रमाणे पाण्याचा दाब कमी असल्याने पुरेसे पाणीही मिळत नाही. गुरुवारी मोटारी उलट्या फिरू लागल्याने पाणी भरता आले नाही. महापालिकेने पाणी रोज सोडणे गरजेचे आहे.
-सारिका पोफाळे, अपेक्षा रिते, नागरिक

फोटो- इंद्रायणीनगर, भोसरी ः इमरान तांबोळी यांच्या घरातील विद्युत उपकरणांचे झालेले नुकसान

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00634 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top