कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

sakal_logo
By

भोसरी, ता. १३ ः येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या रंगरंगोटीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, सुमारे तीस फूट उंचावरील उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला रंग देणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार केला जात नाही. त्यामुळे उड्डाणपुलाला रंग देणाऱ्या कामगारांचा अपघात होण्याची शक्यता आहे.

भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या रंगरंगोटीसह उड्डाणपुलाच्या २४ स्तंभावर आकर्षक नक्षीकामासह निसर्ग चित्रे काढण्यात येत आहेत. मात्र, या उड्डाणपुलाची खालची बाजू काही ठिकाणी सुमारे तीस फूट उंचावर आहे. उड्डाणपुलाच्या खालच्या भागाला रंग देण्यासाठी खाली चाके असणाऱ्या पायाडाचा उपयोग करण्यात येत आहे. मात्र, तीस फूट उंचावर कामगाराच्या सुरक्षिततेसाठीची कोणतीही उपाययोजना नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रंगकाम करताना कामगारांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाच्या रंगरंगोटीचे काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी काही नागरिकांनी केली आहे.

अधिकाऱ्यांशी होऊ शकला
महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी या घटनेबाबत संपर्क केला होता. पण, संबंधित अधिकाऱ्यांशी होऊ शकला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00635 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top