दुसऱ्या दिवशीही रंगला शर्यतीचा थरार भोसरीतील शर्यत ः बैलगाडी मालकांचा उत्सफूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या दिवशीही रंगला शर्यतीचा थरार
भोसरीतील शर्यत ः बैलगाडी मालकांचा उत्सफूर्त प्रतिसाद
दुसऱ्या दिवशीही रंगला शर्यतीचा थरार भोसरीतील शर्यत ः बैलगाडी मालकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

दुसऱ्या दिवशीही रंगला शर्यतीचा थरार भोसरीतील शर्यत ः बैलगाडी मालकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

भोसरी, ता. १९ ः येथील गावजत्रा मैदानात भरलेल्या बैलगाडा शर्यतीत पहिल्या दिवशी दीडशे तर दुसऱ्या दिवशी १४७ बैलगाडा मालकांनी भाग घेत शर्यतीत रंगत भरला. बैलगाडा शर्यतीला बैलगाडा मालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने शर्यतीचा थरार भोसरीकरांनी अनुभवला. पहिल्या दिवशीच्या शर्यतीत साईनाथ नंदकुमार कुटे यांच्या बैलगाड्याने तर दुसऱ्या दिवशीच्या शर्यतीत यात्राप्रेमी बैलगाडा संघटनेच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांक पटकाविले.
भोसरी ग्राम दैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाची सांगता उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीने होते. कोरोना काळातील लॅाकडाऊनमुळे दोन वर्षे उत्सव साजरा करता आला नाही. गावच्या उत्सवात एकच दिवस बैलगाडा शर्यत घेतली जाते. तीही दिवसभर न घेता संध्याकाळी काही तास घेतली जाते. मात्र, भोसरी ग्रामस्थांद्वारे बुधवारी (ता. १८) आणि गुरुवारी (ता. १९) सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत बैलगाडा शर्यती घेण्यात आल्याने कोरोना लॅाकडाऊनचा दोन वर्षाचा कसर भरून काढल्याची चर्चा नागरिकांत होती. पहिल्या दिवशीच्या शर्यतीत साईनाथ नंदकुमार कुटे यांचा बैलगाड्याने १२.११ सेकंदात शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकाविला. राजू वसंतराव जवळेकर यांच्या बैलगाड्याने १२.२३ सेकंदात शर्यत पूर्ण करत दुसरा क्रमांक पटकाविला तर देवराम यशवंत काटे यांच्या बैलगाड्याने १२.५२ सेकंदात शर्यत पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकाविला. दुसऱ्या दिवशी झालेल्या शर्यतीत यात्राप्रेमी बैलगाडा संघटनेच्या बैलगाड्याने १२.६३ सेकंदात शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक मिळवला. बबनराव नाना गायकवाड यांच्या बैलगाड्याने १२.७७ सेकंदात शर्यत पूर्ण करत दुसरा क्रमांक तर बाळासाहेब गेणूभाऊ मंचरे यांच्या बैलगाड्याने १२.७८ सेकंदात शर्यत पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकाविला तर पहिल्या दिवशी घाटाचा राजा म्हणून राजू वसंतराव जवळेकर यांच्या बैलगाड्याला मान मिळाला तर दुसऱ्या दिवशी माजी महापौर राहूल जाधव यांच्या बैलगाड्याला घाटाचा राजा म्हणून सन्मानित करण्यात आले.
फोटो- भोसरी ः गावजत्रा मैदानात रंगलेल्या बैलगाडा शर्यतीचा थरार आणि जमलेली तरुणाई.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00650 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top