महापालिकेकडून चेंबरची दुरुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेकडून चेंबरची दुरुस्ती
महापालिकेकडून चेंबरची दुरुस्ती

महापालिकेकडून चेंबरची दुरुस्ती

sakal_logo
By

सकाळ इम्पॅक्ट


भोसरी, ता. २५ ः येथील आळंदी रस्त्यावर कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानासमोरील रस्त्यावर असलेल्या गटाराच्या चेंबरचे झाकण गायब झाले होते. काही जागरूक नागरिकांद्वारे या चेंबरमध्ये कचऱ्याने भरलेली पोती टाकून झाडांच्या फांद्या लावल्या होत्या. याबाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर महापालिकेने या चेंबरची तातडीने दुरुस्ती केली.

भोसरीतील आळंदी रस्त्यावर वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावर गटाराचे चेंबर आहेत. मात्र, कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानासमोरील रस्त्यावरील गटाराचे चेंबर गायब झाले होते. दुचाकी आणि चारचाकींना या ठिकाणी अपघात होत होते. त्यामुळे काही नागरिकांनी या ठिकाणी कचऱ्याने भरलेली पोती या चेंबरवर ठेवून त्यावर झाडाच्या फांद्या ठेवल्या. त्यामुळे दूरवरून या झाडाच्या फांद्या व पोती दिसत असल्याने अपघाताचा धोका टळला होता. मात्र, रात्रीच्या अंधारात या ठिकाणी वाहन चालकांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या विषयाची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने या चेंबरची तातडीने दुरुस्ती केल्याने वाहन चालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00661 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top