वाहतूक कोंडी आम्ही किती दिवस सहन करायची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक कोंडी आम्ही किती दिवस सहन करायची?
वाहतूक कोंडी आम्ही किती दिवस सहन करायची?

वाहतूक कोंडी आम्ही किती दिवस सहन करायची?

sakal_logo
By

भोसरी, ता. १३ ः येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या शितलबाग ते पीएमपीचा सद्गगुरू डेपोपर्यंतच्या रस्ता. दोन्ही बाजूला दररोज सायंकाळी वाहनांची प्रचंड गर्दी. कोंडीतून मार्ग काढायचा की गाडी घासू नये याची काळजी घ्यायची, की किरकोळ अपघात होवून वादाच्या प्रसंगाला सामोरे जायचे? किती दिवस आम्ही हे सहन करायचे? अशी उद्गविग्नता वाहन चालकांची आहे. अनेक वर्षांपासूनच्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी साऱ्यांची आहे.

सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या सेवा रस्त्यावर वर्दळीचे सात चौक आहेत. प्रत्येक चौकातील अंतर अवघे शंभर ते दोनशे मीटर असल्याने एका चौकातील कोंडीचा परिणाम सातही चौकात होतो. पैकी चांदणी चौक, भोसरी-दिघी रस्ता चौक, भोसरी-आळंदी रस्ता चौक आणि सद्गुरु डेपो रस्ता चौक आदी चौकात वाहतूक नियंत्रक दिवे सुस्थितीत असतानाही ते पिवळ्या दिव्याने फक्त ब्लिंकर पद्धतीने सुरू आहेत. मात्र भोसरी-दिघी रस्ता चौक, आळंदी रस्ता चौक आणि चांदणी चौकाचा अपवाद वगळता एकाही चौकात वाहतूक पोलिस नाहीत. त्यामुळे चौकांतून वाहन चालक अस्ताव्यस्तपणे वाहने चालवितात.
----
चौकाचे नाव वाहतूक कोंडीचे कारण
चांदणी चौक, भोसरी-दिघी रस्ता चौक बेशिस्त चालविण्यात येणारी वाहने.
पीएमटी चौक अरुंद रस्त्याने यु टर्न घेणाऱ्या पीएमपी बस आणि त्यांना अडथळा ठरणारी रस्त्यावरील इतर वाहने
भोसरी-आळंदी रस्ता चौक रस्त्यावर बेशिस्त उभ्या असणाऱ्या रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहने.
चक्रपाणी वसाहत रस्ता चौक येथील बस व एसटी थांब्यावर थांबणाऱ्या बस.
कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह चौक ग्राहकांनी रस्त्यावर थांबवलेली वाहने आणि हातगाड्या.
सद्गुरू डेपो चौक वाहतूक नियंत्रक दिव्यांकडे होणारे वाहन चालकांचे दुर्लक्ष.

काय करता येईल?
-दुपारी चार ते रात्री आठपर्यंत प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे
-चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करून वाहने सलग पुढे जातील असे वेळेचे नियोजन करणे
-रस्त्यावर अस्ताव्यस्त थांबणाऱ्या प्रवासी वाहनांवर कारवाई करणे
-पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूंकडील रस्त्यावर नो पार्किंग, नो हॅाकर्स झोन करणे
-पीएमटी चौकात मोशीच्या दिशेने जाणारी वाहने वळवणे, इतर वाहनांना मज्जाव करणे
-भोसरी-दिघी रस्ता चौकातील वाहनांची वळणे बंद करून भोसरी-आळंदी रस्ता चौक आणि चांदणी चौकातून यु-टर्न घेण्यास लावणे
--
कोट
भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर विनापरवाना रिक्षा व खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. अर्बन सिटीचे काम पूर्ण झाल्यावर सेवा रस्त्यावर नो पार्किंग झोन तयार करण्यात येणार आहे. सेवा रस्त्यावर अस्ताव्यस्त थांबत असलेल्या खासगी प्रवासी वाहनांवर कारवाईही करण्यात येत आहे.
-दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी वाहतूक विभाग.

फोटो
भोसरी-आळंदी रस्ता चौक ः येथे अस्ताव्यस्त थांबविण्यात येणाऱ्या रिक्षा, खासगी प्रवासी वाहने आणि पीएमपी बसमुळे होणारी वाहतूक कोंडी.
पीएमटी चौक ः येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालून यु-टर्न घेणाऱ्या बस आणि इतर वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी.
सद्गुरू डेपो चौक ः येथील वाहतूक नियंत्रक दिव्यांचे वाहन चालकांद्वारे पालन होत नसल्याने वाहतूक कोंडीमुळे पुणे-नाशिक महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00673 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top