पुनर्वसनामुळे महापालिकेची पळापळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनर्वसनामुळे महापालिकेची पळापळ
पुनर्वसनामुळे महापालिकेची पळापळ

पुनर्वसनामुळे महापालिकेची पळापळ

sakal_logo
By

भोसरी, ता. १६ ः पुनर्वसन केलेल्या ठिकाणी ग्राहक येत नसल्याने भोसरीतील इतरत्र ठिकाणी अतिक्रमण करून विविध वस्तू, फळे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सूर भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील पुनर्वसित विक्रेत्यांनी महापालिकेकडे आळवला आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाची पळापळ होत असल्याची चर्चा भोसरीत रंगू लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे भोसरीतील पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील फळे आणि विविध वस्तू विक्रेत्यांचे पुनर्वसन राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली केले आहे. पुनर्वसन ठिकाणाच्या जवळच भोसरी-आळंदी रस्ता चौक आणि पीएमटी चौक आहे. त्याचप्रमाणे येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील हातगाडीधारकांवर कारवाई करण्यासाठी दररोज महापालिकेच्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण धडक कारवाईचे वाहन फेऱ्या मारते. मात्र हे वाहन पुढे निघून गेल्यावर हातगाडीवाले पुन्हा रस्त्याच्याकडेला येतात. पीएमटी चौक परिसर रस्त्यापासून काहीसा दूर असल्याने महापालिका येथील फळे-भाजी विक्रेत्यांवर कारवाई सातत्याने करत नव्हती.

भोसरीतील पीएमटी चौकातील विविध विक्रेत्यांचेही पुनर्वसन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल डोळस आणि चौकातील विक्रेत्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना भेटून केली आहे. पुनर्वसनासाठी महापालिका जागेच्या शोधात असल्याचे क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी सांगितले.
-------------------
विक्रेत्यांकडूनच कारवाईची मागणी
मंगळवारी (ता. १४) भोसरी-आळंदी रस्ता चौकात गावरान आंबे विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणले होते. हे आंबे खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. हे पाहून पुनर्वसन केलेले विक्रेत्यांनी महापालिकेच्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात तक्रार केल्याने येथील आंबेधारकांवर कारवाई केल्याची माहिती ‘ई’ क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी दिली. त्याचप्रमाणे बुधवारी (ता. १५) पीएमटी चौक आणि पुणे नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील हातगाडीवाले आणि पथारीवाले यांच्यावरही कारवाई केली आहे. त्यामुळे पूर्वी अतिक्रमणधारी आता पुनर्वसित असलेले विक्रेतेच अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याची मागणी करत असल्याचे सुखद चित्र भोसरीत पाहायला मिळत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00680 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top