समाजाने खरा कार्यकर्ता ओळखावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजाने खरा कार्यकर्ता ओळखावा
समाजाने खरा कार्यकर्ता ओळखावा

समाजाने खरा कार्यकर्ता ओळखावा

sakal_logo
By

भोसरी, ता. ९ ः ‘‘समाजाला खरा कार्यकर्ता ओळखण्याची डोळस बुद्धी महाकवी वामनदादा कर्डक यांनी त्यांच्या अनेक गीतांतून दिली आहे. समाजाला जाळणारा की तारणारा कार्यकर्ता हे समाजाने ओळखले पाहिजे. असे झाल्यास समाजातून समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे खरे कार्यकर्ते निर्माण होतील,’’ असे मत भीमशाहीर उत्तम फुलकर यांनी भोसरीत व्यक्त केले.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात स्वरांजली कला क्रीडा मंचद्वारे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यकमात ते बोलत होते. या वेळी माजी नगरेसवक विकास डोळस, अनुराधा गोफणे, महालिकेचे प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, किरण गायकवाड, पिंपरी-चिंचवड बौद्धसमाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, उद्योजक भगवान सोनवणे, चरणदास नितनवरे, कुलदीप परांडे, राजेंद्र डोळस, शरद जाधव आदी उपस्थित होते. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रशासन अधिकारी अनिल सूर्यवंशी होते.
या वेळी गायक संकल्प गोळे, बाबू लोणारे, अमर पुणेकर, चित्रसेन भवार, निशांत गायकवाड आदींना स्वराजली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गायिका साधना मेश्राम, कुणाल वराळे, प्रज्ञा इंगळे, मेघानंद जाधव आदींनी भीम गीते गाऊन कार्यकमात रंगत भरली. या वेळी डॅा. सत्यजीत कोसंबी यांनी आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल ज्येष्टांची मुलाखत घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वरांजलीचे अध्यक्ष प्रकाश डोळस, अरुण भारसाकळे, राजेश डोळस, सिद्धार्थ पवार, राजेश थोरात, बाबासाहेब साळवे, अर्जून भादवे, भारत कुंभारे, दिनेश पहुरकर आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक यशवंत डोळस यांनी केले. सूत्रसंचालन संजय बेंडे आणि राहूल सोनवणे यांनी केले. पुरस्काराचे वाचन पल्लवी शेलार आणि बुद्धितेजा बोदडे यांनी केले. तर आभार भारत कुंभारे यांनी मानले.


जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
स्वरांजली कला क्रीडा मंचद्वारे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गायक उत्तम फुलकर, वत्सलाबाई वराळे, दत्ता जाधव, भगवान साठे, नागसेन सावदेकर आदींना दिवंगत भीमशाहीर प्रतासिंगदादा बोदडे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00708 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..