नाटक, लावणी, काव्य मैफल रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटक, लावणी, काव्य मैफल रंगणार
नाटक, लावणी, काव्य मैफल रंगणार

नाटक, लावणी, काव्य मैफल रंगणार

sakal_logo
By

भोसरी, ता. ३० : गणपती उत्सवानिमित्त भोसरी कला क्रीडा मंचद्वारे एक ते पाच सप्टेंबरपर्यंत भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात ‘भोसरी महोत्सव २०२२’चे आयोजन केले आहे. महोत्सवात रसिकांना नाटक, लावणी, काव्य मैफल आदींसह आंतरशालेय नृत्य स्पर्धा, सौंदर्यवती भोसरी स्पर्धा, करावके भोसरी आयडॉल स्पर्धा आदींचाही आनंद घेता येणार आहे. नागरिकांनी या महोत्सवाला हजेरी लावण्याचे आवाहन मंचचे अध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी भोसरीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.
या वेळी मंचचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक विजय फुगे, उपाध्यक्ष भरत लांडगे, सचिव सुनील लांडगे, भाऊसाहेब डोळस, निवृत्ती फुगे, किरण लांडगे, विजय लांडगे, नंदू लोंढे, किशोर गव्हाणे, राजेंद्र सोनवणे, बाळासाहेब भालेराव आदी उपस्थित होते. लांडगे म्हणाले, ‘‘कोरोना काळावर मात केल्यानंतर दैनंदिन जीवन सुरळीत होत असताना कला, क्रीडा, सांस्कृतिक, व्यापारासह इतर सर्व क्षेत्रात आपण स्थिरावत आहोत. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘भोसरी महोत्सव २०२२’चे आयोजन केले आहे.’’
कार्याध्यक्ष विजय फुगे म्हणाले, ‘‘कोरोना मुक्तीचा आनंद साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा भोसरी महोत्सव २०२२ सादर करीत आहोत. महोत्सवात विविध करमणूक कार्यक्रमासह स्पर्धाही होणार आहेत. महत्त्वाचे हे सतरावे वर्ष आहे.’’
भोसरी महोत्सवाची सुरवात गुरुवारी (ता.१) सायंकाळी सहा वाजता सिनेकलाकार अशोक सराफ, निर्मिती सावंत अभिनित विनोदी नाटक व्हॅक्यूम क्लिनरने होणार आहे. शुक्रवारी (ता. २) सायंकाळी चार वाजता सुप्रसिद्ध गजलकार म. भा. चव्हाण, कवी व सिनेकलाकार किशोर कदम (सौमित्र) यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता काव्य मैफल रंगणार आहे. शनिवारी (ता. ३) सकाळी दहा वाजता आंतरशालेय नृत्य स्पर्धा व सायंकाळी करावके आयडॉल स्पर्धा होणार आहे. महोत्सवाची सांगता पूनम कुडाळकर आणि सीमा पुणेकर यांच्या ‘तुमच्यासाठी कायपण!’ या लावणीच्या कार्यक्रमांनी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या महोत्सवादरम्यान छायाचित्रकार नंदू लोंढे यांनी लेह, लढाख, ओली आदी ठिकाणी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही एक ते पाच सप्टेंबरपर्यंत भरविण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00722 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..