कला क्रीडा मंचाकडून शहराला नवी दिशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कला क्रीडा मंचाकडून शहराला नवी दिशा
कला क्रीडा मंचाकडून शहराला नवी दिशा

कला क्रीडा मंचाकडून शहराला नवी दिशा

sakal_logo
By

भोसरी, ता. २ : ‘‘भोसरी कला क्रीडा मंचाने भोसरी शहराला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. शहरातील नागरिकांना कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, कवी संमेलनासह इतरही मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने मंचद्वारे होत आहे. सांस्कृतिक वारसा वाढीसाठी राजकीय व्यासपीठ बाजूला ठेवून भोसरीकर एकत्र येऊन काम करतात, हीच परंपरा मंचाने जपली आहे,’’ असे मत आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत व्यक्त केले.
भोसरी कला क्रीडा मंचद्वारे भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘भोसरी महोत्सव २०२२’चे उद्‍घाटन आमदार लांडगे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते. माजी खासदार अमर साबळे, वसंत लोंढे, मंचचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, कार्याध्यक्ष विजय फुगे, उपाध्यक्ष भरत लांडगे, सचिव सुनील लांडगे, बाळासाहेब गव्हाणे, श्यामराव फुगे, राजेंद्र लांडगे, मोरेश्वर शेडगे, सुनंदा फुगे, सोनाली गव्हाणे, सारिका लांडगे आदी उपस्थित होते.
मंचचे अध्यक्ष स्थायी समितीचे माजी सभापती ॲड. लांडगे म्हणाले, ‘‘परिसरातील सर्वसामान्य नागरिक, कामगार वर्ग आणि कष्टकरी यांना दैनंदिन व्यस्ततेतून विरंगुळा मिळावा, मनोरंजक कार्यक्रमातून कुटुंबीयासमवेत वेळ घालविण्यास मिळावा त्याचप्रमाणे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महोत्सवाचे आयोजन केले आहे. पाच तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवातील विविध कार्यक्रमाचा आनंद नागरिकांनी घ्यावा.’’
सिने अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत अभिनेता व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा आनंद श्रोत्यांनी घेतला. या वेळी छायाचित्रकार नंदू लोंढे यांनी लेह-लडाख, आॅली येथे काढलेल्या छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटनही झाले. नाट्यगृहाचे व्यवस्थापक दिलीप फुगे आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी केले. आभार विजय फुगे यांनी मांडले.

नाट्यगृह भव्य मात्र
कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाचे कौतुक करताना सिने अभिनेते अशोक सराफ म्हणाले, ‘‘इतके भव्य आणि सुंदर नाट्यगृह भोसरीमध्ये असेल अशी कल्पना नव्हती. नाट्यगृह सुस्थितीत आहे. मात्र, येथे व्यावसायिक नाटके का होत नाहीत. ती होण्यासाठी येथे प्रयत्न होणे आवश्यक आहे.’’ यावर आमदार महेश लांडगे यांनी नाट्यगृहात व्यावसायिक नाटके घेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00726 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..