भोसरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम
भोसरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम

भोसरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम

sakal_logo
By

भोसरी, ता. ८ : ‘‘जगण्याची कला म्हणजे धम्म होय. तथागत गौतम बुद्धांनी जीवन जगण्यासाठी काया, वाक (वाचा) आणि मन या तीन सुचिता सांगितल्या आहेत. या सुचितांचे सर्वांनी पालन केल्यास जीवन आनंदी व समाधानी होईल,''‘ असे मत व्याख्याते प्रा. मुबीन तांबोळी यांनी व्यक्त केले.
भोसरीतील इंद्रायणी नगरातील धम्म निनाद बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण गायकवाड होते. यावेळी यावेळी पिंपरी चिंचवड बुद्ध विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस यांच्यासह आंबेडकरी समाज बहुसंख्येने उपस्थित होता.
प्रा. तांबोळी पुढे म्हणाले, "आरोग्य सुदृढ राहण्यासाठी काया सुचिताचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समाज एकत्रित आणण्यासाठी वाक सुचिता प्रत्येकाने अवलंबिली पाहिजे. मन सुचिता राखण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्ग आचरणात आणले पाहिजे."
यावेळी डोळस म्हणाले, "समाजाने आपापसातील हेवेदावे गट-तट विसरून धम्म कार्यासाठी एकत्र आले पाहिजे. ‌ एकत्र आल्यास समाजाचा विकास करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होतील." कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव वाळके यांनी केले. तर संतोष मोरे यांनी आभार मानले.