दिघीतील बुद्धविहारात वर्षावासाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिघीतील बुद्धविहारात 
वर्षावासाची सांगता
दिघीतील बुद्धविहारात वर्षावासाची सांगता

दिघीतील बुद्धविहारात वर्षावासाची सांगता

sakal_logo
By

भोसरी, ता. १२ ः दिघीतील विक्रमशीला प्रबोधनी बुद्धविहारात घेण्यात आलेल्या वर्षावासाची सांगता विविध कार्यक्रमांनी झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण भारसाकडे होते. प्रबोधिनीचे अध्यक्ष निखिल बागुल, कार्याध्यक्ष रोशन गडलींग, प्रशांत जगताप, सोनू शेळके, सुमेध थोरात, मयूर गायकवाड, मधुकर वनकर, अरुण सोनवणे आदींसह बौद्ध बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वजीत बनसोडे, संजीवन कांबळे, अजय डोळस, भगवान शिरसाट, अनिल गायकवाड, राजू गायकवाड आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात झेन पद्धतीच्या ध्यानधारणेने करण्यात आली. बुद्ध वंदना, पंचशील त्रिशरण घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या या ग्रंथाचे वाचन सुमेध थोरात यांनी केले. उपस्थितांना अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पुणेकर यांनी केले. तर आभार गोरखनाथ वाघमारे यांनी मानले.