भोसरी बीआरटी टर्मिनलचे विक्रमी उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरी बीआरटी टर्मिनलचे विक्रमी उत्पन्न
भोसरी बीआरटी टर्मिनलचे विक्रमी उत्पन्न

भोसरी बीआरटी टर्मिनलचे विक्रमी उत्पन्न

sakal_logo
By

भोसरी, ता. २९ ः दिवाळीच्या काळात बसच्या फेऱ्या तीस टक्के कमी झाल्या असतानाही भोसरी बीआरटीएस टर्मिनलमधील कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजनाद्वारे सर्व प्रवाशांना वेळेत व सुखकर प्रवास घडवत सुमारे ७५ लाखांचे विक्रमी उत्पन्नही घेतले आहे.
दिवाळीच्या सुटीत गावाला जाण्यासाठी प्रवासी शहर परिसरातून कात्रज, पुणे मनपा, पुणे स्टेशन, हडपसर आदी भागांकडे पीएमपी बसने प्रवास करतात. त्यामुळे, पीएमपीच्या थांब्यावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलमध्येही दिवाळीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. त्यातच तांत्रिक अडचणींमुळे पीएमपीच्या तीस टक्के फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, भोसरी बीआरटीएस टर्मिनलचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांद्वारे बसच्या फेऱ्यांचे योग्य नियोजन करत प्रचंड गर्दीतही प्रवाशांचा प्रवास सुखकर केला. प्रवाशांच्या गर्दीचा चोरटेही चोऱ्या करण्यासाठी फायदा घेत असतात. मात्र, कर्मचाऱ्यांद्वारे प्रवाशांना शिस्तीत आणि रांगेतच बसमध्ये सोडण्यात येत असल्याने भोसरी बीआरटीएस टर्मिनलमध्ये चोरीची एकही घटना घडली नाही.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे, पिंपरी मुख्यालय क्रमांक दोनचे प्रमुख सुनील दिवाण, भोसरी सद्‍गुरु आगार प्रमुख विजयकुमार मदगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी बीआरटीएस टर्मिनल प्रमुख काळुराम लांडगे, विजय आसादे, वाहक अमर राजेकर, किसन देवकाते, बाळासाहेब गुंडाळ, दिलीप ठोकळ, राजा तपसे, चालक विठ्ठल थिगळे, गुलाब पिंगळे आदींसह बसवरील वाहक-चालक आदींनी नियोजन केले.

दिवाळी काळात भोसरी बीआरटीसचे उत्पन्न पुढील प्रमाणे -

तारीख (आॅक्टोबर महिना) मिळालेले उत्पन्न (रुपये)

२१ व २२ २०,७६,७३९

२३ व २४ १७,९१,३४०

२५ व २६ २३,४७,६०४

२७ १३,४२,६४५