भोसरीतील स्वस्त धान्य दुकानाला जिल्हाधिकारी देशमुख यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीतील स्वस्त धान्य दुकानाला
जिल्हाधिकारी देशमुख यांची भेट
भोसरीतील स्वस्त धान्य दुकानाला जिल्हाधिकारी देशमुख यांची भेट

भोसरीतील स्वस्त धान्य दुकानाला जिल्हाधिकारी देशमुख यांची भेट

sakal_logo
By

भोसरी, ता. ३० ः भोसरीतील स्वस्त अन्नधान्य दुकानाला जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी भेट देऊन दुकानाची पाहणी केली. शिधापत्रिका धारकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या वेळी तहसीलदार अपर्णा तांबोळी, परिमंडळ अधिकारी नागनाथ भोसले, पुरवठा निरीक्षिका वंदना साबळे, माजी नगरसेविका सुनंदा फुगे, एन. बी. फुगे आदींसह धान्य खरेदी करण्यास आलेले शिधापत्रिकाधारक उपस्थित होते.

भोसरीतील एन. बी. फुगे यांच्या स्वस्त अन्नधान्य दुकानास जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी दहा वाजता अचानक भेट दिली. या वेळी स्वस्त धान्य दुकानातील ६० शिधापत्रिकाधारकांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाधिकारी देशमुख यांनी शिधापत्रिका धारकांना ‘वेळेवर धान्य मिळते का?, धान्यांसाठी किती रक्कम देता?, आनंदाचा शिधा मिळाला का?, मोफत धान्य मिळाले का? दर महिन्याला शिधा दिली जाते का? आदी प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे दुकानातील स्वच्छता, कर्मचारी आदींच्या पाहणीबरोबरच दुकानातील अन्नसाठ्याची, साठवणुकीची जागा आणि धान्याची पडताळणी केली. या वेळी गेल्या महिन्यात पॉस यंत्रामधील बिघाडामुळे अन्नधान्य मिळण्यास उशीर झाल्याच्या तक्रारी काही शिधापत्रिका धारकांनी मांडल्या.