‘राजमाता जिजाऊ स्वराज्य निर्मात्या होत्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राजमाता जिजाऊ स्वराज्य निर्मात्या होत्या’
‘राजमाता जिजाऊ स्वराज्य निर्मात्या होत्या’

‘राजमाता जिजाऊ स्वराज्य निर्मात्या होत्या’

sakal_logo
By

भोसरी, ता. १३ ः भोसले आणि जाधव घराण्याचा वारसा राजमाता जिजाऊंनी पुढे चालवून बाल शिवाबांवर उत्तम संस्कार केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शिकवण त्यांनी दिली. रयतेचे राज्य निर्माण करण्याचे मार्गदर्शन शिवबाला केले. खऱ्या अर्थाने राजमाता जिजाऊ स्वराज्य निर्मात्या होत्या असे मत व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी भोसरीत व्यक्त केले.
लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ व प्रबोधन परिवाराद्‍वारे शिवसृष्टी चौकात राजमाता जिजाऊ जयंती व प्रबोधन यात्रेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार व मंडळाचे संस्थापक विलास लांडे, सचिव सुधीर मुंगसे, विराज लांडे, अतिश बारणे, प्रकाश मासुळकर, संजय उदावंत उपस्थित होते. यावेळी विलास लांडे म्हणाले, ‘‘राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी जिजाऊंचा आदर्श घेऊन यशाचे उत्तुंग शिखर गाठावे.’’ युवकांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त प्रबोधन पर्व सोहळ्याची सुरवात एक जानेवारीला सिंदखेडराजापासून सुरू होऊन सिल्लोड, औरंगाबाद, अहमदनगर, जुन्नर, सातारा, कराड, आष्टा, विटा, सांगली, टेंभुर्णी, मंगळवेढा, कल्याण, मुरबाड, पुणे या मार्गाने प्रबोधन करीत १२ जानेवारीला यात्रेचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नेहा बोरसे यांनी केले. तर आभार प्रा. किरण चौधरी यांनी मानले.