भोसरीमध्ये योग प्रात्यक्षिके

भोसरीमध्ये योग प्रात्यक्षिके

भोसरी, ता. १९ ः भोसरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती योग प्रात्यक्षिके, मिरवणूक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन आदी कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. भोसरीतील मास्टर माइंड विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक ढोल ताशा व लेझीमच्या गजरात काढली. आळंदी रस्ता ते पीएमटी चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी योगा प्रात्यक्षिकही सादर केली. या वेळी मुख्याध्यापिका प्रदीपा नायर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रोग्रेस ऑटीझम एज्युकेशन सोसायटीमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी मावळ्यांच्या वेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक वाजत गाजत काढली. सोसायटीच्या मुख्याध्यापिका जयश्री विष्णू शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com