
भोसरीत शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
भोसरी, ता. २० : येथील इंद्रायणीनगरमधील आदर्श समाज विकास संघाच्या धम्मनिनाद बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अरुण गायकवाड यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब डोळस होते. या वेळी संजय गायकवाड, पोपट भालेराव, शरनपा कैतनकेरी, अमरनाथ तायडे, आशुतोष कदम, आयुष डोळस, करण तायडे, प्रसेनजित वाळके, अक्षय कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोरे यांनी केले. तर आभार नामदेव वाळके यांनी मानले.
लांडेवाडीमधील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी आमदार विलास लांडे, संस्थेचे खजिनदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त माजी नगरसेवक विक्रांत लांडे, व्याख्याते गणेश शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, रजिस्ट्रार अश्विनी भोसले, रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रेया दाणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे सादर करण्यात आले. या वेळी गणेश शिंदे यांचे व्याख्यान झाले. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.