दिघी, चऱ्होलीतील सायक्लोथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिघी, चऱ्होलीतील सायक्लोथॉन 
स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग
दिघी, चऱ्होलीतील सायक्लोथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

दिघी, चऱ्होलीतील सायक्लोथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

sakal_logo
By

भोसरी, ता. १० : दिघी, बोपखेल व चऱ्होली या प्रभागातील महिलांसाठी सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘सायकल चालवा निरोगी रहा’ असा संदेश महिलांनी ‘महिला सायक्लोथॉन २०२३’ द्‍वारे दिला. यावेळी आयोजिका माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व शिवाई सहकारी पतसंस्थेचे संचालक संजय गायकवाड यांच्या हस्ते ध्वज दाखवून सायक्लोथान स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी सायकल खेळाडू प्रिती मस्के, अभिनेत्री पूजा वाघ, प्रिया कोसुंकर, स्नेहछाया प्रकल्प संचालिका सारिका इंगळे, सचिन लांडगे, सामाजिक कार्यकर्ते मनोज गायकवाड, प्रल्हाद जगताप, अभिनेते प्रसाद खैरे, डॉ. नीलेश लोंढे, जितेंद्र माळी, प्रल्हाद जगताप, बाबासाहेब पारडे, पंडित शिंदे, सुभाष पिंगळे, भाग्यदेव घुले आदी उपस्थित होते. सहभागी महिला व तरुणींचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दिघीतील मॅविक सायकल क्लब यांचे स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घोलप यांनी केले. आभार दत्ता घुले यांनी मानले.