Tue, June 6, 2023

डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षपदी अमोल डोळस
डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षपदी अमोल डोळस
Published on : 10 March 2023, 2:23 am
भोसरी ः भोसरीगावातील ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव’ समितीच्या अध्यक्षपदी अमोल डोळस यांची निवड झाली. चार दिवसाच्या या महोत्सवात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. निवडीसाठीच्या बैठकीत माजी नगरसेवक सखाराम डोळस, पवना बँकेचे संचालक राजशेखर डोळस, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक दीपक डोळस, उद्योजक राजेंद्र डोळस, ज्येष्ठ मार्गदर्शक विलास डोळस, यशवंत डोळस, देविदास डोळस, दिनकर डोळस, विजय भालेराव आदी उपस्थित होते. किरण डोळस यांनी सूत्रसंचालन केले.