दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण
दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण

दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण

sakal_logo
By

भोसरी, ता. १५ ः चक्रपाणी वसाहतीतील काही भागात दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. सोमवार (ता.१३) आणि मंगळवार (ता.१४) काही जणांच्या पाण्यामध्ये अळ्या आल्याने पाणी प्यावे कसे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील हनुमान कॉलनी, शास्त्री चौक, पसायदान कॉलनी, गाडगेमहाराज सोसायटी, जय महाराष्ट्र चौक आदी भागातील सुमारे चारशे घरांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देविदास गोफणे यांनी दिली.

स्थानिक रहिवासी प्रतिक्रिया ः
दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. चक्रपाणी वसाहतीतील बॅडमिन्टन हॉलजवळ ड्रेनेजच्याजवळच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन आहे व ती कुजल्याने अस्वच्छ पाणी येत असल्याचे ययाती डफळ यांनी सांगितले. हुतात्मा चौकात राहणारे फक्कडराव पितांबरे यांनी त्यांच्या घरातील नळाच्या पाण्यात अळ्या आल्याचे सांगितले.

- इंद्रायणीनगरातील परिस्थिती
पंधरा दिवसांपूर्वी भोसरीतील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोन, तीन, सातसह खंडेवस्ती आणि पेठ क्रमांक एकमधील काही भागात दुर्गंधीयुक्त हिरव्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा झाला होता. भोसरी एमआयडीसीतील विश्वेश्वर चौकातील पाण्याच्या पाइप लाइनमध्ये बिघाड झाल्याने ही परिस्थिती उद्भवली होती.

‘‘परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पांजरपोळमधील पाण्याच्या टाकीची आठ दिवसांपूर्वी स्वच्छता केली होती. त्यामुळे नळाला सुरवातीला थोड्या प्रमाणात गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. चक्रपाणी वसाहतीतील बॅडमिन्टन हॉलजवळील पाण्याची नादुरुस्त पाइपलाइनची दुरुस्ती केली आहे. मात्र, ज्या नागरिकांच्या घरात गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्या भागात पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल.’’
- विजय लाडे , कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा विभाग