भोसरीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकी

भोसरीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकी

भोसरी ः ढोल-ताशाचा गजर... लेझीमचा ठेका... डीजेचा घनघनाट...फटाक्यांची आतषबाजी...छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांचा जयघोष... आकर्षक सजावटीत विराजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणुकीतील प्रतिमा...व्याख्यान...स्नेहभोजन...भीमगीते आदी कार्यक्रमांनी भोसरी, इंद्रायणीनगर, दिघीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
भोसरीतील इंद्रायणीनगरातील आदर्श समाज विकास संघाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची इंद्रायणीनगर परिसरात मिरवणूक काढण्यात आली. धम्मनिनाद बुद्धविहारात पालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक संजय वाबळे, सीमा सावळे, योगिता लोंढे, पिंपरी-चिंचवड बौद्ध विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे, अॅड. अजय डोळस, अॅड. समेध घनवट, अॅड. प्रियांका खंडागळे आदी उपस्थित होते. दुपारी स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला. गायिका प्रज्ञा इंगळे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव वाळके यांनी केले.

दिघीतील विक्रमशिला प्रबोधिनी बुद्धविहारात गायक प्रवीण गडलिंग यांची भीमगीते, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी कृष्णा ओव्हाळ आणि पूनम ओव्हाळ यांना धम्मभूषण पुरस्कार देण्यात आला. डॉ. भारती चव्हाण, जितेंद्र गायकवाड, प्रा. मुबिन तांबोळी, प्रा. सुशील म्हसदे, सुभाष औरदकर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक साळवे गुरुजी यांचे व्याख्यान झाले. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक विकास डोळस, उत्सवसमिती अध्यक्ष अभिनेते रोशनकुमार गडलिंग, बुद्धविहाराचे अध्यक्ष निखिल रोहिणीकर, प्रवीण पुणेकर, गोरखनाथ वाघमारे, सोनू शेळके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणेकर व मयूर गायकवाड यांनी केले. भोसरीतील संविधान चौकात प्रदेश सचिव अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टी राहुल ओव्हाळ, रेखा ओव्हाळ, दिलीप ओव्हाळ, शशिकांत ओव्हाळ, प्रशांत ओव्हाळ, गौतम ओव्हाळ, रूपेश ओव्हाळ, गौतम डोळस, नलिनी ओव्हाळ आदींनी सरबत वाटप केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com