सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनाने
आंबेडकर जयंतीची भोसरीत सांगता

सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनाने आंबेडकर जयंतीची भोसरीत सांगता

भोसरी, ता. २५ ः भोसरीतील धम्मदूत मैत्री संघाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सांगता शुक्रवारी (ता.२९) रोजी झाली. यावेळी सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन सत्र झाले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारपासून (ता. १९) शुक्रवारपर्यंत (ता.२१) कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पालवे गुरुजी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, अभिनेता रोशन गडलिंग, बौद्ध विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल डोळस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज डोळस होते. भोसरीतील संविधान प्रबोधन केंद्रांतर्गत बौद्धिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. त्यात लहान गटात अनुक्रमे प्रणीत इंगळे, सर्वज्ञ पडघमोल, क्रांतिज्योती गायकवाड, स्वरा ससाणे यांनी क्रमांक मिळवले. सूत्रसंचालन पूनम ओव्हाळ आणि राजू हिवराळे यांनी केले. तर आभार कृष्णा ओव्हाळ यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com