Fri, Sept 22, 2023

भोसरीत आज वधू-वर मेळावा
भोसरीत आज वधू-वर मेळावा
Published on : 20 May 2023, 2:07 am
भोसरी, ता. २० ः पिंपरी-चिंचवड बौद्ध समाज विकास महासंघ व शाहूनगरमधील धम्मचक्र बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध वधू-वर नोंदणी व परिचय मेळावा रविवारी (ता.२१) आयोजित केला आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शाहूनगर येथील धम्मचक्र बुद्धविहारात परिचय कार्यक्रम होणार आहे. तसेच, अनिल सूर्यवंशी कौटुंबिक सलोखा राखण्यासाठी उपदेशपर मार्गदर्शन करणार आहेत. वधू-वर मेळाव्यास येताना फोटो, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, नोकरीविषयक पुरावा, आधारकार्ड आदींसह रहिवासी पुरावा घेऊन येणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ८७८८६१२८७९ या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस आणि बुद्धविहाराचे विश्वस्त सुरेश कसबे यांनी केले आहे.