
भोसरीत सत्संग सोहळ्यात बालकांना संस्काराचे धडे
भोसरी, ता. २९ ः ‘‘लहान मुलांना योग्य संस्कार मिळाले तर ती समाजाला पोषक असे सुजाण नागरिक बनू शकतात. अन्यथा, संस्काराअभावी समाजाला घातक प्रवृत्ती तयार होताना दिसतात,’’ असे मत संत निरंकारी मंडळाचे अमृतपाल सिंह यांनी भोसरीतील संत निरंकारी भवनात संत निरंकारी मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बाल संत सत्संग सोहळ्यात व्यक्त केले.
दिल्लीतील संत निरंकारी मंडळाचे मोहन छाब्रा, पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी आदींसह लहान मुले-मुली, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन निरंकारी सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. या वेळी मुला-मुलींनी गीत, अभंग, विचार, नृत्य, नाटिका यांद्वारे निरंकारी सद्गुरूंची शिकवण यावर प्रकाश टाकला. नाटिकांच्या माध्यमातून मिशन रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जल स्वच्छ अभियान याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली. सत्संगाचा इतिहास आणि शिकवण यावर प्रश्नमंजूषाही घेण्यात आली. सूत्रसंचालन प्रेरिता रावलानी आणि प्रथमेश साक्रूडकर या बालकांनी केले.
भोसरी ः संत निरंकारी भवनात घेण्यात आलेल्या बाल संत सत्संग सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.