भोसरीत कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
भोसरी, ता. २३ ः रांगोळ्यांच्या पायघड्या... ढोल-ताशांचा गजर... विद्यार्थिनींचा लेझीमवरील ठेका... आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाचा जयघोष अशा वातावरणात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भोसरीतील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीमच्या गजरात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढत अभिवादन केले. प्रतिमेचे पूजन शालेय सल्लागार समितीचे अध्यक्ष सतिशचंद्र जकाते, मुख्याध्यापिका उषा निगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जनाबाई काकडे, वसंत कदम, विलास पुंडे, ज्ञानेश्वर घुले, अंबादास सायंबर, सुदाम शिंदे आदी उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक न्यू इंग्लिश स्कूल शाळेपासून गंगोत्री पार्क, दिघी रस्ता, संत तुकारामनगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आदी मार्गाने काढण्यात आली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी दत्तात्रेय शिंदे, रुक्मिणी कोळी, अभय दराडे, सुषमा गांजुरे, माधुरी सहाणे, वर्षा जाधव, अशोक मोरे, मोनिका घुले, प्रियांका बागल आदींनी परिश्रम घेतले.