पाण्याच्या मागणीसाठी चिखलीत ‘रास्ता रोको’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याच्या मागणीसाठी
चिखलीत ‘रास्ता रोको’
पाण्याच्या मागणीसाठी चिखलीत ‘रास्ता रोको’

पाण्याच्या मागणीसाठी चिखलीत ‘रास्ता रोको’

sakal_logo
By

चिखली, ता. ११ : येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी चिखली गावाला मिळावे, या मागणीसाठी रविवारी येथील शिवाजी चौकात सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
चिखली येथे महापालिकेच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यात आलेले आहे. त्यासाठी चिखली गायरानातील सुमारे आठ हेक्टर जमीन घेण्यात आलेली आहे. असे असताना या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी चिखली येथील रहिवाशांना यांना मिळणार नसल्याचा खुलासा महापालिकेकडून करण्यात आलेला आहे. चिखली परिसरात कायमच पाणीटंचाई जाणवत असूनही महापालिकेची पाणी न देण्याची भूमिका अन्यायकारक असल्याचे मत चिखलीतील व्यक्त केले जात आहे. याबाबत एक डिसेंबरला ‘सकाळ’मध्ये ‘जलशुद्धीकरण केंद्र मात्र पाणी मिळेना’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी न देण्याच्या भूमिकेमुळे चिखलीकरांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर चिखलीतील नागरिक रस्त्यावर उतरले आणि रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले.