चिखली-आकुर्डी रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखली-आकुर्डी रस्त्यावर
वाहतूक कोंडी नित्याचीच
चिखली-आकुर्डी रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच

चिखली-आकुर्डी रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच

sakal_logo
By

चिखली, ता. २० ः चिखली आकुर्डी रस्त्यावर नेवाळे वस्ती ते सत्संग आश्रमादरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. चिंचोळा रस्ता आणि चार बाजूने एकाच वेळेस येणारे वाहने त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या बाबत रस्त्यावरील अडथळे आणि महावितरण चे पोल हटवून रस्ता रुंदीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांनी महापालिकेकडे केली आहे.
नेवाळे वस्ती ते सत्संग यादरम्यान एकेरी रस्ता आहे. याच ठिकाणी चिखली व सोनवणेवस्ती तसेच आकुर्डी साने चौक आणि घरकुल परिसरातील वाहने ये जा करतात. चारही बाजूने एकाच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे तासनतास वाहतूक कोंडी होते. सायंकाळच्या वेळी कामावरून घरी जाणारे कामगार बस किंवा सायकलने जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ लागतो. त्यातच या रस्त्यावर उपयोगात नसलेले महावितरण पोल आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकच भर पडत आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून या परिसरातील रस्ता रुंदीकरण करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

फोटो आयडी 31542,31543
-------